Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Jun 29, 2024

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.

आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

बिबट्या सदृश प्राण्याचा दोन विद्यार्थ्यांवर हल्ला ; न्यायडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण

बिबट्या सदृश प्राण्याचा दोन विद्यार्थ्यांवर हल्ला ; न्यायडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील महसुल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वनक्षेत्रामध्ये बिबट्या...

read more
सेंट्रल रेल्वे मजदूर कारखाना शाखा मनमाड कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

सेंट्रल रेल्वे मजदूर कारखाना शाखा मनमाड कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

सेंट्रल रेल्वे मजदूर कारखाना शाखा मनमाड कार्यालयामध्ये राजमाता,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची...

read more
पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडीकरांच्या जागा मालकांचा मोजणीस विरोध ; भूमी अभिलेख चे अधिकारी परतले मोजणी न करताच

पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर परिसरातील जागेत...

read more
शिवसेना कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त पूजनाचा कार्यक्रम संपन्न

शिवसेना कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त पूजनाचा कार्यक्रम संपन्न

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]