loader image

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

Jul 4, 2024


विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदीनी समस्त देशवासियांच्या वतीनं भारतीय टीमचं अभिनंदन करत संवाद साधला.

टी-20 विश्वविजेता भारतीय संघ आज सकाळी नवी दिल्लीत दाखल झाला. वेस्ट बार्बाडोसमधील अंतिम सामन्यात द. आफ्रिकेला 7 धावांनी नमवून टीम इंडियाने विजय मिळवला. तेथील चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला होता. यानंतर टीम इंडियाला विशेष विमानाने आज भारतात आणले. यानंतर आज सकाळी ११ वाजता टी-20 विश्वविजेत्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पीएम मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेर भारतात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्वविजेत्या संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, सहाय्यक कर्मचारी, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय चक्रीवादळ बेरीलमुळे बार्बाडोसमध्ये अडकले होते.

नवी दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघ हॉटेल मौर्यमध्ये काही काळ आराम केला. यानंतर भारतीय संघ पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघासोबत सुमारे दोन तास चर्चा केली.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
.