नांदगांव : मारुती जगधने तालुक्यातील चिंचविहिर येथे बिबट्याने विक्रम भागवत दानेकर वय ६० वर्ष या शेतकर्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले.
दि. १० जुलै रोजी विक्रम दानेकर हे सायंकाळी ६:३० वा. विहिरीवर पाणी घ्यायला गेले असता मकाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांच्या पाठीवर पंजा मारल्याने पाच सात ठिकाणी गंभीर जखमा झाल्या या वेळी त्यांनी बिबट्यास जबरदस्त प्रतिकार करून परतवून लावले व
आरडा ओरडा केल्याने शेतातील रहिवासी मदतीला येताच बिबट्या तेथून पसार झाला नंतर जखमीस चिंचविहिरचे सरपंच किशोर नवले,उपसरपंच रामेश्वर तुरकुने, व ग्रामस्थांनी नांदगांव ग्रामीण रुग्नालयात उपचारास दाखल केले, त्या नंतर वनविभागाने जखमीची रुगनालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान चिंचविहिर येथे ज्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या दरम्यान बिबट्याने
तुरकुणे व जाधव वस्तीवर लावलेल्या पिंजर्यातुन
आठ दिवसापुर्वी बिबट्याने राञी शेळी पिंजर्यातुन अोढून फस्त केली . तसेच वस्तीवरील पाच सहा कुञ्यांची देखील शिकार केली असे असताना बिबट्या पिंजर्यात येत नाही म्हणून दि १० जुलै रोजी दुपारी ४ वा पिंजरा तेथून हलविला व ६:३० वा बिबट्याने विक्रमवर हल्ला केला.
माञ चिंचविहीर येथे पिंजरा लावलेल्या कालावधीत
Cctv मध्ये राञी बिबट्या दिसून आला तरी देखील या संदर्भात येथे वनविभागाने हलगर्जीपणा केल्याने शेतकर्यावर हल्ला झाल्याचे नागरीक सांगतात. सदर ठिकाणी बिबट्याचे CCTV. मध्ये दर्शन झाले तरी तेथून पिंजरा हलवला व नंतर अडीच तासात बिबट्याने शेतकर्यावर हल्ला केला.
प्रतिक्रिया : बिबट्याने हल्ला केलेला शेतकरी गंभीर स्थितीत आहे पण त्यांची प्रकृती स्थिर आहे वेळ प्रसंगी वेळ आल्यास त्याना उपचाराला बाहेर हलवू. डाॅ राठोड ग्रामीण रुग्नालय नांदगांव
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये “ जागतिक यकृत दिन” साजरा
नाशिक: जागतिक यकृत दिन २०२४ च्या निमित्ताने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी...










