loader image

कासलीवाल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Jul 22, 2024


नांदगाव:
दिनांक-22जुलै2024
नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील शिक्षकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुमहिमा वर्णन
करतांना शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांबरोबरच
आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करावे कारण आईवडील प्रथम गुरु असतात असे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर भारतीय परंपरेतील गुरुशिष्य नात्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, गोरख‌ डफाळ, विशाल सावंत, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा पाटील व दिव्या महाजन या विद्यार्थीनींनी तर खुशाली शिंदे हिने आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
.