नांदगाव : मारुती जगधने
महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनने आशा गट प्रवर्तकांच्या मागण्या संदर्भात निदर्शने व आंदोलन करण्यात आले दि २५ रोजी सकाळ सञात आंदोलन करुन मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले पंचायत समिती कार्यालायाच्या मुख्य गेटवर हे आंदोलन करण्यात आले यावेळी मागणी संदर्भात घोषना देण्यात आल्या .या प्रसंगी केलेल्या मागण्या वाढीव मानधनासह थकीत मानधन मिळावे,आशा स्वयमसेविकांना मिळणार्या मानधनाची वेतन चिठ्ठी मिळावी ,आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करावे,आशा ना घरकुल योजनेचा लाभ मिळावा,१० हजाराचा मानधन आदेशाचा जी आर काढण्यात यावा, गटप्रवर्तकाना राज्यकर्मचारी दर्जा मिळावा, आशा व गटप्रवर्तकाना पेनशन लागू करावे या प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या .
या प्रसंगी कल्पना शिंदे,विजय दराडे,छाया जाधव,लता लाठे,संगिता काकडे, ज्योती निकम, सुप्रिया पाटील,सुरेखा गंडे,रत्ना केदारे, संगिता बोरसे, उज्वला खताळ,दिपाली सानप,रिना ठाकुर ,मोहिनी मेंद,छाया सोनवने, शितल शेळके यांच्या निवेदनावर सह्या आणी नावे आहेत.