loader image

नांदगाव तालुकास्तर शालेय योगा स्पर्धा संपन्न..

Aug 11, 2024


 

क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचेद्वारे आयोजित नांदगाव तालुकास्तर शालेय योगासन स्पर्धा सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड येथे बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन सेंट झेवियर्स हायस्कुल चे मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी केले, उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना खेळ व खेळातून होणारा व्यक्तिमत्त्व विकास याबाबत उद्बोधन केले. सदर स्पर्धेत 14, वर्ष वयोगट मुले मुली17 वर्ष वयोगट मुले मुलीआणि 19 वर्ष या वयोगटात एकूण 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सदर प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे तसेच पंच म्हणून श्री सुनील ढमाले सर यांनी काम पाहिले. श्री. विजय कोळी सर विशाल झाल्टे शिरसाठ मॅडम उपस्थित होते. तालुकास्तरीय योगा स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल चा खेळाडू साई योगेश डिंबर यांनी 14 वर्षे वयोगट मुलांमध्ये प्रथम क्रमांक ,तसेच 17 वर्षे वयोगटात मुलींमध्ये कृतिका अशोक देवकर हिने प्रथम क्रमांक आणि आरती वसंत अहिरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे .शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम , उपमुख्याध्यापिका ज्योस्त्ना तसेच पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे यांनी स्पर्धेतील विजय खेळाडूंचे अभिनंदन केले .
सदर स्पर्धेचे यशस्वी नियोजन सेंट झेवियर्स हायस्कुल चे जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री सुधाकर कातकडे सर तसेच श्री परविंदर रिसम सर यांनी केले. श्री दत्तू जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.