loader image

मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Aug 15, 2024

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली देशाचा स्वातंत्र्योत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आजच्या तरुणाईने देशाप्रति निष्ठा व आदर ठेवून कार्य करावे. भारत हा सर्वात तरुण देश आहे तरुणाईच्या बळावर भारत लवकरच महासत्ता होईल. लेफ्टनंट प्रकाश बर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस देसले, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य पी. के बच्छाव, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक देविदास सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, वरिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक सुहास वराडे, कनिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक महेंद्र वानखेडे, महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक स्वयंसेविकांकडून विविध सामाजिक संदेश पर रांगोळ्या काढण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्र सेना द्वारे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-प्राचार्य मुकेश मिसर हे होते. कार्यक्रमाच्या...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास...

read more
बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
.