loader image

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

Aug 30, 2024


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सनदी लेखापाल सी.ए. श्रेणिक बरडीया यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना “करिअर ऑपॉर्च्युनिटी इन जी.एस.टी” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी एस.बी.आयच्या शाखा प्रबंधक श्रीमती स्नेहल वाघ यांनी “करिअर ऑपॉर्च्युनिटी इन बँकिंग सेक्टर” या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांनी सातत्याने नवनवीन क्षेत्राचा ध्यास घेऊन परिश्रम करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी थोरे यांनी केले. सूत्रसंचालन व अतिथी परिचय डॉ. आरती छाजेड तर आभार प्रदर्शन प्रा. समाधान सुखदेवे यांनी केले याप्रसंगी आय. क्यू. ए.सी कॉर्डिनेटर डॉ. प्रकाश वानखेडे, डॉ. घुगे डॉ. परदेशी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.