loader image

के आर टी मध्ये परिवहन समितीची सभा संपन्न

Sep 6, 2024

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतीच परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यात शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांना बोलवण्यात आले होते. सर्व वाहनधारकांना प्राचार्य मुकेश मिसर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित रित्या करावी, विशेषत: आपल्या वाहनात असणाऱ्या विद्यार्थिनींची अधिक दक्षता घ्यावी. आपल्या वाहनातील प्रत्येक विद्यार्थ्यास शाळेच्या आवारात सोडणे व शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवारातूनच घेऊन जाणे याचे पालन करावे. तसेच मोटर वाहन कायद्यात उपलब्ध तरतुदीप्रमाणे आपल्या वाहनासंदर्भात कागदपत्रे अद्यावत ठेवणे वेळोवेळी वाहनांची तपासणी संबंधित विभागाकडून या बाबी काटेकोरपणे पाळाव्यात अशा सूचना केल्या.

परिवहन समितीच्या या सभेत उपस्थित वाहनधारकानी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या हिताने विविध सूचना केल्या. परिवहन समितीच्या सभेचे आयोजनास प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, श्री धनंजय निंभोरकर यांच्यासह शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.