loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

Sep 8, 2024


मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय पर्यवेक्षक श्री.अनिल निकाळे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. पारखे मॅडम व माजी शिक्षक केशव आचारे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , श्री चक्रधर स्वामी आणि मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय गायक वृंदाने ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी कावेरी वाबळे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमार तुषार काळे याने केले. कुमारी श्रद्धा आल्हाट, कस्तुरी धात्रक यांनी अनुक्रमे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर तेरेसा यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती आपल्या भाषणात दिली. तर वैभव वडक्ते याने इंग्रजीतून केलेल्या भाषणातून शिक्षकांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मा.मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारे योगदान स्पष्ट करून समस्त शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. श्री सुनील कुमार कटारे यांनी श्री. चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेने देखील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या दिवशी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालवली. मुख्याध्यापक म्हणून आर्यन जोगदंड तर उपमुख्याध्यापिका म्हणून कीर्ती दराडे या विद्यार्थ्यांनी आपली भूमिका चोख बजावली. इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर भूमिका अनुभवल्यात.


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.