loader image

आपल्या पाल्यासाठी संपत्ती कमावण्यापेक्षा त्याला संपत्ती कमावण्या योग्य बनवा

Sep 10, 2024

प्राचार्य डॉ. सुभाष निकम
मनमाड: शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये अध्यापनाबरोबर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत शिक्षक, विद्यार्थी याबरोबरच पालक हा घटक देखील महत्त्वाचा आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे पालकांनी संपत्ती कमावण्यापेक्षा आपल्या पाल्याला संपत्ती कमावण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे शिक्षक पालक सभा आयोजित केली होती याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर पालक प्रतिनिधी म्हणून श्री विद्याधर वाघ, श्री गोरखनाथ अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, शिक्षक पालक सभेचे चेअरमन श्री एस. डी. देसले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल सातपुते, प्रास्ताविक पी. व्ही. अहिरे व आभार श्री एस. डी. देसले यांनी व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.