loader image

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

Sep 16, 2024


छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद
मनमाड – आम्ही परंपरा पाळतो… ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…. ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात सलग 28 व्या वर्षी रविवार दिनांक 15/09/2024 रोजी सकाळी ठीक 09-00 वाजता श्री सत्य विनायक महापूजा तसेच यंदाही सलग 10 व्या वर्षी रविवार दि.15 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद शुद्ध द्वादशी निमित्ताने सायंकाळी 6.00 वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण आला या महत्व पूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते . तर या धार्मिक परंपरा असणार्‍या छपन्न महाभोग (महानैवेद्य) या कार्यक्रमामध्ये सर्व गणेशभक्तांनी स्वतःच्या घरी तयार केलेले (कांदा लसूण, वांग यांचा वापर नसलेले ) तिखट,गोड, विविध प्रकारची फळे असे सर्व प्रकारचे नैवेद्य भाविकांनी आणले होते केळीच्या पानावर हा महानैवेद्य मांडण्यात आला प्रत्येक नैवेद्य पदार्थ वर तुळशी पत्र,दुर्वा ठेवण्यात आले होते या महा नैवेद्य ला आकर्षक जास्वंदी च्या फुलांची सजावट करण्यात आली होती रात्री 8-00 वाजता श्री निलमणीची महाआरती झाले नंतर या छप्पन भोग महाप्रसादाच्या लाभ घेणे साठी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गणेश भक्त बंधू भगिनीं अबाल वृद्धा नी अलोट गर्दी केली होती या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.