या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या भक्तीत लहान ,थोर सर्वच भावविभोर झाले.अखेर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि सर्वांचे डोळे पाणावले.
चांदवड चे कलाशिक्षक,प्रसिद्ध फलक चित्रकार श्री.देव हिरे यांनी पाण्याखाली रांगोळीच्या सहाय्याने श्रीगणेशाची प्रतिमा साकारून बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला आहे. ही पाण्याखालील रांगोळी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ही पाण्याखालील पोर्ट्रेट रांगोळी साकारण्यासाठी श्री.देव हिरे यांना 4 तास इतका कालावधी लागला.

के आर टी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
मनमाड - येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा शाळेचा...