सूवा फीजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४५ किलो वजनी गटात यूथ ज्युनियर सीनियर या तिन्ही वयोगटात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत ६७ किलो स्नॅच ७९ किलो क्लीन जर्क १४६ किलो वजन उचलून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी तीन सुवर्णपदके पटकावीत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे
आकांक्षा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर येथे सराव करीत आहे
आकांक्षा सध्या वागदर्डी विद्यालय येथे इ १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे
युथ ज्युनियर सीनियर या तिन्ही वयोगटात सुवर्णपदक मिळविणारी आकांक्षा नाशिक जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे
आकांक्षा छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व सध्या फिजी येथे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार वागदर्डी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले.

राशी भविष्य : १५ एप्रिल २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....