Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

Oct 16, 2024

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच शालेय ग्रंथालयातील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणा-या विविध विषयांवरील पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती. संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी मॅडम,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम तसेच शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले. यावेळी विदयार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उर्दू व मराठी माध्यमातील विद्यार्थी, विदयार्थीनींनी व शिक्षक, शिक्षिकांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.व पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले. नियमित वाचनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले. संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]