loader image

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Oct 17, 2024


मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाआतील कु. निलेश बाराहाते (400 व 110 हर्डल्स, प्रथम) व कु. तुषार भालशिंगे ( 200 मी धावणे, प्रथम व 1500 धावणे, तृतीय ) तसेच पुणे विद्यापीठ व नाशिक विभागीय क्रीडा समिती आयोजित आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील कु. महेश घुगे (400 हर्डल्स प्रथम ) या खेळाडूंनी विजय संपादन केला. मनमाड महाविद्यालयातील या खेळाडूची विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, क्रीडा संचालक प्रा.सुहास वराडे, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.