loader image

नांदगाव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात तीन जणांचा मृत्यू झाला

Oct 27, 2024


नांदगाव तालुक्यातील बांणगाव येथे आई मुलगा व मामा मेंढी धुण्यासाठी गेले असता तळ्यात पडून मृत्युमुखी झाले या घटनेमुळे खिर्डी ता.नांदगांव येथे शोककळा पसरली आहे .

 

आधी मूलगा नंतर आई नंतर मामा पाण्यात बुडून मुत्यू मुखी ,,पडल्याची घटना दु:खदायक आहे .काळजाचा थरकाप उडविणारी हि घटना

बाणगांव बुद्रुक येथील बाणगांगा नदीवरील पाझर तलावात घडली . पाझर तलावात आपल्या मेंढ्या धुत असतांना वाल्मीक बापु ईटणर वय वर्षे 12 हा पाण्यांत पडला त्याला वाचवण्यासाठी आई इंदूबाई बापू इटणर वय वर्षे 32 ने पाण्यात उडी घेतली परंतू आपल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्नात ती पण खोल पाण्यात निघून गेली हे दृश्य पाहून इंदूबाई ईटणर चा भाऊ अंबादास केदु खरात वय वर्षे 25 यांने पाण्यात उडी मारुन वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो पण फसला व तिघेही खोल पाण्यात गाळात अडकल्याने पाण्यात बुडवून मुत्यू पावले आज दुपारी 3,30 वाजता घटणा घडली बाणगांव बुद्रुक येथील स्थानिक नागरिकांनी पाण्यात शोध घेवून दोरी च्या सहायाने मुत्यू देह बाहेर काढले नांदगाव आमदार सुहास कांदे यांच्या रुग्ण वाहिणेकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले घटना स्थळी नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी हजर होते.
घटनेतील मयत हे खिर्डी ता. नांदगांव येथील रहिवाशी होते.


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.