loader image

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

Nov 12, 2024


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे ८ ते ११ नोव्हेंबर २०१४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साडेतीनशे खेळाडूंनी सहभागी होत चुरस वाढवली
19 वर्षातील मुलींच्या 49 किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने चुरशीच्या लढतील सुवर्णपदक पटकावले तसेच १७ वर्षा आतील मुलींच्या ८१ किलो वजनी गटात आनंदी विनोद सांगळे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे.
कृष्णा संजय व्यवहारे,साहिल यादवराव जाधव,अनिरुद्ध देवेंद्र अडसुळे,दिव्या उपेंद्र सोनवणे,वैष्णवी आतिश शुक्ला ,श्रावणी विजय पुरंदरे,यांनी आपापल्या वजनी गटात रौप्य पदक पटकावले.कस्तुरी दिनेश कातकडे हिने आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत कास्यपदक पटकावले.
प्रांजल शरद आंधळे,अक्षरा सुहास व्यवहारे, साक्षी राजाराम पवार, श्रावणी वाल्मीक सोनार, सृष्टी राहुल बागुल, आयुष बाळू देवगिर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

 


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.