loader image

मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन

Dec 12, 2024


 

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “शांतता… पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाचन आणि शैक्षणिक संस्कृतीला बळकटी करण्यासोबत जगात पुण्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १४ डिसेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी जनजागृती म्हणून आजचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे असे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ आर एस लोखंडे, यांनी विशद केले. या उपक्रमात दिलेल्या वेळेत ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी उपलब्ध असलेले किंवा आपल्या आवडीचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र क्यूआर कोड च्या माध्यमातून अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या उपक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. देविदास सोनवणे, प्रा. डॉ. पी जी आंबेकर, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.