loader image

सी ए परीक्षेत मनमाड चा प्रेम रवींद्र थोरे जिल्ह्यात दुसरा

Dec 28, 2024

मनमाड : सनदी लेखापाल अर्थात सीए परीक्षेत नाशिकमधील १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रसन्न सुराणा याने ४६२ गुणांसह देशात १६ वा क्रमांक तसेच जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला, मनमाड नगर परिषदेतील रवींद्र थोरे यांचे चिरंजीव प्रेम थोरे याने ३८६ गुण घेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. यंदा निकालाची टक्केवारी घसरली. इंटर आणि फायनल असा दोन्ही मिळून २० टक्के निकाल लागला.

सीएची अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली. यात जुन्या अभ्यासक्रमातून नव्या अभ्यासक्रमात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. सुराणा याने यापूर्वीही फाउंडेशनमध्ये देशात तिसरा तर इंटरमिजिएटमध्ये देशात अकरावा क्रमांक मिळवला होता. साहिल रामचंदाणी याने ३७८ गुण घेत तिसरा क्रमांक, विराज बाफना याने ३७६ गुण घेत चवथा तर कोमल गुप्ता याने ३७५ गुण गेत पाचवा क्रमांक मिळवला. दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा देणाऱ्या २५० पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ग्रुप १ मध्ये ३०९ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप २ मध्ये १४८ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील एकून उत्तीर्णतेचे प्रमाणात मागच्यावर्षी पेक्षा घट झाली आहे.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.