मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या डॉ. आरती छाजेड यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकाचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तसेच ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यामागची भूमिका यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे यामध्ये ऑनलाइन व्यवहार सतर्क राहून केले पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण पाटील यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे,पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे श्री चैतन्य ठाकूर तर आभार श्री राजेंद्र बागुल यांनी व्यक्त केले.
राशी भविष्य : १६ एप्रिल २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...