loader image

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

Dec 31, 2024


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन परिपत्रक व सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्या पत्रकानुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत विवेकानंद आश्रम संभाजीनगर व ग्रंथालय विभाग मनमाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रांगणात पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले. या अंतर्गत स्वामी विवेकानंदांची पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. मनमाड महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके यावेळी विद्यार्थ्यांनी खरेदी केली. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस देसले, पर्यवेक्षक प्रा डी. व्ही सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ आर. एस. लोखंडे, महाविद्यालयातील शिक्षक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.