loader image

फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Jan 4, 2025


 

मनमाड :- फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड चे प्राचार्य भूषण शेवाळे सर,मनमाड नगरपरिषदेचे अभियंता संजय संदानशिव व फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे संस्थापक, अध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.मंचचे मार्गदर्शक डॉ.प्राध्यापक जालिंदर इंगळे सर यांनी प्रास्ताविक केले.या वेळी मंचचे अध्यक्ष अहमद बेग (चाचा),हाजी शफी मुसा शेख,पत्रकार आमीन नवाब शेख, इस्माईल पठाण,शरद घुसळे,सनी अरोरा, गुरुकुमार निकाळे,दादाभाऊ शार्दूल, विजय उबाळे,शकूर शेख तसेच एच.ए.के.हायस्कूल चे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर व याच शाळेतील शिक्षक शानूल जगताप, जाविद मुश्ताक शेख, प्रदीप पाटील, युनूस खान, मोहम्मद साजिद उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन करणारे फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी सर्वांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.