दि.१४ जानेवारी २०२५.
मकर संक्रांत
या सणाला पतंग उत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे.लहान असो वा मोठे सर्व रंगीबेरंगी पतंग उडवून हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा खेळ आता जीवघेणा ठरत आहे. पूर्वी साधा सुती दोरा वापरून पतंग उडवीत असत पण आता सर्रास नायलॉन व चिनी मांजा वापरला जातो. हाच मांजा पशु पक्षी व मानवाला जीवघेणा ठरतोय.
उत्साहाच्या सणात या मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक पशु-पक्षी ,लहान मुलं, व माणसांना ईजा झाली. मकर संक्रांत सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी पतंग उडवताना सुती दोरा वापरावा,अधिक उंच व धोक्याच्या ठिकाणाहून पतंग उडवू नये. नायलॉन व चिनी मांजा चा वापर टाळावा व दुचाकी वरून जातांना हेल्मेट सह गळ्याला रुमाल किंवा स्कार्प गुंडाळावा.
वरील शालेय दर्शनी फलक रेखाटनातून हाच समाजोपयोगी संदेश देण्यात आला आहे.
फलक रेखाटन- देव हिरे.
(शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...