loader image

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Feb 17, 2025


श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरा गड येथील महंत जितेंद्र महाराज उपस्थित होते.

बंजारा समाज बांधवांच्या वतीने आमदार श्री सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सौ अंजुमताई सुहास कांदे उपस्थित होते.

या वेळी बोलतांना जितेंद्र महाराजांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कार्याची स्तुती केली, मागच्या वेळी आलो तेव्हा ज्याने बंजारा समाजाला मान पान दिला त्यालाच मतदान करण्याचे आव्हान केले होते आणि बंजारा समाजाने एकमताने सुहास आण्णांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.

सौ. अंजुमताई कांदे यांनी आपल्या मनोगत आम्ही सर्व कुटुंबीय बंजारा समाजाचे उपकार कधी विसरणार नाही, यापुढेही समाजासाठी कार्य करत रहा आणि भविष्यात संत सेवालाल महाराज यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्याची संकल्पना असल्याचे बोलून दाखवले.

प्रास्ताविक: एन के राठोड यांनी संपूर्ण समाज आण्णांच्या पाठीशी कालही होता, आजही आहे आणि भविष्यात ही राहील असा विश्वास बोलून दाखवला

बंजारा फेम ईशांत (गीतांजली) चव्हाण व कलाकारांनी विविध सांस्कृतिक लोकगीते व भक्ती गीते सादर केली.

यावेळी मोकेश्वरनगर नायडोंगरी जिल्हा परिषद शाळा च्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी अनेक लोकगीतांवर नृत्य तसेच देशभक्तीपर नाटके सादर केली.

कार्यक्रमाला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य अध्यक्ष भिकन जाधव, डॉ उदय मेघावत, डॉ शांताराम राठोड, विजय चव्हाण, डॉ शाम जाधव, बाबू तोताराम चव्हाण, समिती अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण, सोमनाथ पवार समिती चे सर्व सदस्य तसेच बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.