मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला. महाविद्यालयातील अनुष्का देवरे या विद्यार्थिनीने महाराजांविषयीचे आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. व्ही. आर फंड, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. आर एस लोखंडे, श्री प्रशांत सानप महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पवन परदेशी यांनी केले. तर आभार प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जे डी वसईत यांनी मानले.

फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...