loader image

फलक रेखाटन : मराठी नववर्ष गुढीपाडवा

Mar 29, 2025


गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. नवसंकल्प करत प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस.
सर्वत्र मोठ्या उत्साहात व थाटामाटात हा सण साजरा केला जातो. या थाटमाट व झगमगाटा पासून आणि अर्थव्यवस्थेपासून दूर असलेला कष्टकरी वर्ग जो ऊन ,वारा, पाऊस,कडाक्याची थंडी याची तमा न बाळगता नशिबी आलेलं कष्ट आनंदाने जगत असतो.
हा भटकंती करणारा शेतमजूर,ऊसतोड कामगार,मेंढपाळ,पंचाळ,धनगर इ.समाजवर्ग डोक्यावर आभाळाची चादर घेऊन गावोगाव भटकंती करत पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर आपला संसार मांडतो. पदरात पडलेलं गोड मानत समाधानाने कष्ट करत उद्याच सुस्वप्नं बघत येणारे सण साधेपणाने पण, अभिमानाने व आनंदाने साजरे करतो. शहरातील सणा चा झगमगाट बघता गाव खेड्यातील सण साजरा करण्याचा हा साधेपणा व कष्टकरी वर्गाचा उत्साह लक्ष वेधून घेतो.
गुढीपाडवा सणानिमित्त कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी या सर्व कष्टकरी समाजाचं प्रतीकात्मक फलक रेखाटन नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. विद्यालयाच्या दर्शनी फळ्यावर साकारले आहे.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.