loader image

एनसीसीविभागाचे ५ छात्र बनले अग्निवीर

Apr 2, 2025


 

मनमाड-: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ५ एनसीसी छात्रांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली.मनमाडमहाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने आपली परंपरा कायम राखत विभागाचे कॅडेट नरेंद्र दराडे , कॅडेट शुभम ताडगे , कॅडेट विशाल थोरे, कॅडेट अमर घाडगे व चेतन पानसरे या छात्रांनी अग्निवीर होण्याचा बहुमान मिळविला.सर्व छात्रांनी आपल्या मनोगतामध्ये एनसीसी मुळे शारीरिक, बौद्धिकज्ञान आणि सर्वात महत्वाचे भरतीसाठी आवश्यक असलेली शिस्त व वेळेचे महत्व एनसीसीमुळे अग्निवीर होण्यासाठी कामी आला.एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रकाश रमेश बर्डे यांनी प्रास्ताविकात यशस्वी छात्रांचा परिचयकरून देत अग्निवीर स्कीम बाबत उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.अरुण वि पाटील यांच्या हस्ते एनसीसी छात्रांचा सत्कार करण्यात आला व भविषात महाविद्यालयातर्फे कोणतीही शैक्षणिक मदत लागल्यास ती पुरवली जाईन असे कडेट्सना आश्वासन दिले. निवड झालेल्या छात्रांना संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय डॉ.प्रशांतदादा हिरे,संस्थेच्या कोषाध्यक्षा स्मिताताई हिरे संस्थेचे समन्वयक माननीय डॉ.अपूर्वभाऊ हिरे व 50 महाराष्ट्र एनसीसी छ.संभाजीनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी एस ठाकूर यांनी कडेट्स यांना पुढील वाटचालीस सुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी कुलसचिव समाधान केदारे, उपप्राचार्य डॉ बी.एस.देसले, प्रा.डी.व्ही.सोनवणे, प्रा.एम सी नागरे,क्रीडा संचालक संतोष जाधव,प्रा.किरण पिंपळे, डॉ. सुनील घुगे, प्रा. सोमनाथ पावडे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
.