loader image

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Apr 11, 2025


म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शरद वाघ यांनी आपल्या व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या महिला शिक्षण, अस्पृश्यता निवारण तसेच एकूणच त्यांनी केलेल्या समाजसुधारनेविषयक कार्यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते होते.तसेच बहुजनांना शिक्षित करण्याचे मोठे काम ज्योतिबा फुले यांनी केले. तसेच त्या काळातील समाजात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, जुनाट भुरसटलेल्या चालीरीती कमी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. असे विचार डॉ पाटील यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष अहिरे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ किरण पिंगळे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
.