नांदगाव:
क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त आमदार सुहास (आण्णा) कांदे व सौ. अंजुमताई सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
या वेळी बोलतांना अण्णांनी उपस्थितांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. लवकर या ठिकाणी फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा असेल आणि आपण अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असे सांगितले.
सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या वेळी शिवसैनिक, शिवसेना नेते, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, फुले प्रेमी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राशी भविष्य : १५ एप्रिल २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....