मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपशिक्षक शानूल सुभाष जगताप सर यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

फलक रेखाटन : दि.१४ एप्रिल २०२५ भीम जयंती “भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळल !”
कला शिक्षक देव हिरे यांचे बाबासाहेबांना शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून अनोखं अभिवादन....