loader image

भोंगळे रोडवरील लंगडा गतिरोधक

Apr 16, 2025


 

नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव येथील भोंगळे रोडवरील साठ फुटी रोडवरील अर्धवट आणि असुरक्षित गतिरोधकांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रस्त्यावर गतिरोधक अर्धवट बांधले गेले असून, काही ठिकाणी ते अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक द्यावे लागतात, परिणामी अपघातांची शक्यता वाढते.

स्थानिक नागरिकांनी संबंधित प्राधिकरणांकडूनी , या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची मागणी केली आहे. तथापि, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भोंगळे रोडवर नव्यानेच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे रस्ता चांगल्या स्थिती झाला आहे परंतु या रस्त्याला अर्धवट गतिरोधक बसवल्याने नागरिकांच्या नाराजीला सुरू उमटला रोडच्या अर्ध्या भागामध्ये गधी रोधक बसला आहे आणि अर्धा भाग मोकळा सोडला आहे ही गतिरोधक बसवण्याची कुठली पद्धत आहे ही पद्धत नांदगाव मध्ये नव्याने सुरू झाल्याचे दिसते एक तर तो गती विरोधक पूर्ण करा नाहीतर मग जो अर्धा गतिरोधक आहे तो काढून टाका अशी मागणी होत आहे. रस्त्याचे काम करताना संबंधित ठेकेदाराने असा गतिरोधक कसा बनवला कोणाच्या सूचनेवरून बनवला याबाबत चौकशी करण्यात यावी आणि तशी कारवाई देखील करण्यात यावी कारण की या ठिकाणी रोज दोन पाच लोक गतिरोधकावर पडत असतात किरकोळ इजा त्यांना होते काही ना गंभीर दुखापत होते आणि अशा समस्या निर्माण होऊ नये यासाठी एक गतिरोध पूर्ण काढून टाका किंवा त्या गतिरोधकाला पांढरे मारावे पिवळे मारलेले नाही असा हा भोंगळे रोडवरील गतिरोधकाचा भोंगळा कारभार. अर्धवट गतिरोधक असल्याने नागरिक याला भोंगळे रोडवरील लंगडा गतिरोधक म्हणू लागले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.