loader image

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

May 2, 2025


 

गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा छत्रपती संभाजी नगर येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील खुशाल परुळकर याने हिंगोली अंडर 16 विरुध्द खेळताना सामण्याच्या पहिल्या डावात 125 चेंडूंमध्ये 1 षटकार तसेच 18 चौकारांसह ताबडतोब 110 धावा फटकवल्या.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय सामण्यात खुशालचे हे पहिले शतक व आतापर्यंतचा त्यांचे हे वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
खुशाल भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु असुन सध्या नंदुरबार जिल्हासंघात मनमाडचे नेतृत्व करत आहे.

मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार संघाने 335 धावपर्यत मजल मारली आहे.
या प्रदर्शनासाठी खुशालची मनमाडमध्ये प्रशंसा केली जात आहे. नंदुरबार संघ पहिला डाव 335 वर सर्वबाद असुन दिवसाअखेरिस हिंगोली जिल्हा संघ 85 धावांवर एक गडी बाद आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या कामगीरिसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळडुला प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.