loader image

परधाडी ता. नांदगाव येथे महावितरणचे उपकेंद्र सबस्टेशन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

May 4, 2025


नांदगाव : मारुती जगधने परधाडी येथील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर असून येथील 33 के व्ही कंपनीच्या वितरणाच्या सबस्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून परधाडी या. नांदगाव येथे महावितरण उपकेंद्र मंजूर करण्यात आले. याचे भूमिपूजन माजी आमदार अनिल आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे उपस्थित होते.
यावेळी परधाडी ग्रामपंचायत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार सुहास कांदे यांचा राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर परधाडी ग्रामपंचायत महिला सरपंच व सदस्यांनी सौ अंजुमताई सुहास कांदे यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना अनिल आहेर यांनी आमदार सुहास कांदे यांनी आपल्या कार्याच्या जोरावर मतदार संघातील जनमानसात स्वतःची जागा निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत परधाडी व परिसरातील गावातील लोकांनी भरभरून मते दिल्याची परतफेड म्हणून शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल अशा या सबस्टेशनच्या भूमिपूजन होत असल्याचे सांगितले. पुढे बोलताना परधाडी व परिसरातील गावांच्या विविध प्रलंबित समस्या आपण लवकरच सोडवाल अशी आशा व्यक्त केली.
आमदार सुहास कांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार अनिल आहेर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिले हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही .यापुढे आपण जो आदेश कराल त्या आदेशाचे पालन केले जाईल असा शब्द दिला. लवकरच न्यायडोंगरी येथे सौर ऊर्जा प्लांट निर्माण होऊन या पंचक्रोशीतील नागरिकांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकरी बांधवांच्या हाल अपेष्टा दूर होतील असेही सांगितले.
परधाडी येथे निर्माण होत असलेल्या उपकेंद्र सब स्टेशन मुळे न्यायडोगरीच्या मोठा लोड कमी होईल आणि परधाडी व पंचक्रोशीतील गावातील शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे .
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती विलास आहेर
शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, किरण कांदे, प्रमोद भाबड, संचालक अमोल नावंदर ,अनिल वाघ, जीवन गरुड, गोरख सरोदे, हरेश्वर सुर्वे, ठेकेदार समाधान पाटील ,बाळासाहेब आव्हाड, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, गोकुळ कोठारी, पिंटू शिरसाट, शिवाजी बच्छाव, ऍड किरण गायकवाड, उदय पवार, माया गायकवाड सुरेखा पवार सरला पवार ,आशाबाई साबळे, शारदा बागुल, आदि सह पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.