मनमाड: येथील,महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या, प्राणिशास्त्र विभाग व येवला येथील वन विभागातर्फे 3 मे हा जागतिक बिबट दिनाचे औचित्य व मनमाड शहरपरिसरातील सद्यपरिस्थीला अनुसरून करण्यात आले.सदर कार्यक्रमात,मांजर कुळातील बिबट हा प्राण्याचे सध्यामानवी वस्त्यांकडे धाव घेण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट व इतर वन्यप्राणी यांच्या जीवनमान व वर्तणुकी संधर्भात विद्यार्थ्यांमधे जनजागृती होऊन भविष्यात होणारा मानव व बिबट यांचा संघर्ष टाळावा या साठी ध्वनिचित्रफित व व्याख्यानाच्या माध्यमातून, वन्यप्राण्यांचे नागरी वस्तीतील आकर्षण , कारणे व प्रतिबंध यांची माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी (आय.एफ.एस.)राहुल घुगे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.प्राचार्य पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांच्या मुळगावातील त्यांचे व शेतकरी बांधवांचे बिबट प्राणी संदर्भातील अधिवास,सुरक्षा व उपाययोजना बाबत प्रत्यक्ष अनुभव व्यक्त केले व पुढील वर्षापासून वन्यप्राणी आरोग्यशास्त्र व छायाचित्रण प्रशिक्षण हे नवीन विषय प्राणीशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून येतील असे म्हटले, या कार्यक्रमाचा लाभ शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ जे डी वसईत, यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.पवनसिंग परदेशी यांनी केले.कार्यक्रमास,वनपाल एस आर माळी, वनरक्षक गोपाल राठोड, वनरक्षक सोनाली वाघ, वनसेवक इरफान सैय्यद, वाहन चालक गणेश चव्हाण, परीक्षा अधिकारी डॉ. रोहित शिंदे,कुलसचिव समाधान केदारे, वन व सर्पमित्र अभय जाधव, कमलेश कुमार, प्रा. गजभिये, डॉ व्ही.जी राठोड, प्रा शरद वाघ यांच्यासह विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.