मनमाड – शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात शुक्रवार दिनांक 16/05/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (वैशाख कृष्ण चतुर्थी) निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी 06 वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री 10 – 35 वाजता { दाते पंचांग नुसार चंद्रोदय :रात्री 10 -27वाजता } महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.

नांदगावला युवासेनेच्या शिलेदारांच्या नियुक्त्या
नांदगाव - रविवार ११ मे रोजी कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना...