loader image

फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचा समारोप नुकताच पार पडला.

Jun 1, 2025


बातमी :
दिनांक ३१/०५/२०२५

या वर्षी देखील इयत्ता ६ वी ते पदवी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी कोर्सला भरघोस प्रतिसाद दिला. मागील ४० दिवसांपासून दररोज घडयाळी ३ तास क्लास घेण्यात आला. त्यात विदयार्थ्यांना इंग्रजी लेखन, वाचन, संभाषण व व्याकरण कौशल्य हे डिजिटल बोर्ड व अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने शिकविले गेले. कोर्सच्या सुरूवातीसच विदयार्थ्यांना ‘दि इंग्लिश मॅन्युअल’ हे पुस्तक व इतर लेखन साहित्य पुरविण्यात आले. प्रत्येक विदयार्थ्यांची प्रवेशपरिक्षा घेवून इंग्रजी विषयात त्यांच्या आकलनाची नोंद घेण्यात आली. नंतर विदयार्थ्यांच्या लेखन कौशल्यात झालेल्या प्रगतीचे मूल्यमापन विविध चाचण्या घेवून करण्यात आले. तसेच संभाषणकौशल्याचेही नियोजन करून इंग्रजी बोलण्याचा सराव विदयार्थ्यांकडून करून घेतला.

प्रत्येक विदयार्थ्यास बोलण्याची योग्य संधी मिळावी यासाठी विदयार्थ्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले. यात कस्तुरी घुगे, ईश्वरी पवार, मनस्वी पगार, श्रृती शिंदे, हर्षदा शेळके, विना लोढा, समर परदेशी, प्राजक्ता कुदाळ, सिमरन चुनियान, वैभवी दखने, उन्नती बेदमुथा, नेहा कांबळे, रिया कांबळे व प्रणव दराडे या विद्यार्थ्यांनी सादर केलेला डेमो पालकांना विशेष भावून गेला. समारोपासाठी पालकांसमोर इंग्रजीत बोलण्याच्या प्रात्यक्षिकासाठी पालक आवर्जून उपस्थित होते. पालकांच्यावतीने सौ. प्रिया उपाली परदेशी-निकुंभ यांनी मनमाड शहरात फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याची, लिहिण्याची जी व्यवस्था केलेली आहे व विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले व क्लासच्या सर्व टिमचे या कार्यात ठेवलेल्या सातत्याबद्दल अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे नीटनेटके सुत्रसंचलन कु. देवश्री शर्मा व कु. सई शाकाव्दिपी या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासचे संस्थापक संचालक श्री. मुकेश मिसर यांनी मांडले. मागील २४ वर्षापासून शहरी व ग्रामीण भागात तसेच सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल श्री. मिसर सर यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण कोर्स यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कु. अमिता झाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वेळोवेळी कोर्सच्या विविध बाबी पूर्ण करण्यासाठी श्री. राजेश सोनवणे, श्री. राम महाले, सौ. गौरी जोशी आणि सौ. राजश्री बनकर मैडम व सौ. अनिता शाकाव्दिपी यांचेही सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.