loader image

दि. २१ जून २०२५ जागतिक योग दिन || वारकरी भक्तीयोग ||

Jun 20, 2025


२१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून ओळखला जातो. शरीर,मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मनःशांती ची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे ‘योग ‘ अशी योगाची आधुनिक व्याख्या केली जाते. योग मानवजातीसाठी मोठे वरदान आहे.
आपल्या महाराष्ट्राला संत ,वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. पांडुरंगाच्या भेटीला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा निघाला आहे. योगायोग म्हणजे २१ जून योग दिनाच्या दिवशी पुणे येथे या पालख्या व लाखो वारकरी भाविकांसह १२०० पायी दिंड्या एकत्र येऊन योगाभ्यास करणार आहेत.योग दिनाच्या दिवशी हा अभिनव योगवरीचा वारकरी भक्तीयोग सोहळा व योगिनी स्मार्त एकादशी चा योग म्हणजे भक्तियोगाचा दुग्धशर्करा योग आहे.
शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू फलक रेखाटनातून वारकरी संप्रदयासह सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
— फलक रेखाटन – देव हिरे. ( शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.