loader image
[ays_poll id=7]

छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात

Jun 21, 2025


“केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृडता ही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया!” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे यांनी विश्व् योग दिनाच्या निमित्ताने येथे केले.
येथील छत्रे विद्यालयाच्या सीतालक्ष्मी हॉल मध्ये विश्व योगदिन उत्साहात साजरा झाला.या प्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर,संचालक आणि पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ,शाळेचे मुख्याध्यापक प्रविण व्यवहारे,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,वरिष्ठ पर्यवेक्षिका संगीत पोतदार,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मोरे सर,बालवाडी प्रमुख गवते मॅडम तसेच सर्व प्राथमिक,माध्यमिक शिक्षक वृंद शिक्षकेतर, NCC कॅडेट व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रविण व्यवहारे सरांनी संयोजन करत सर्व योग प्रकार समजावले.व प्रत्येक प्रकारचे आपल्या आरोग्यासाठीचे महत्व सांगितले.कृष्णा व्यवहारे, भाग्यश्री पवार व शाळेचे शिक्षक धनंजय भामरे यांनी केलेली आसने तसेच सर्व प्राणायाम प्रकारांचे सर्व विद्यार्थी व शिक्षक,पदाधिकारी यांनी अनुकरण करत सर्व प्रकारची आसने व प्राणायाम प्रकार केले.


अजून बातम्या वाचा..

मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
.