loader image
[ays_poll id=7]

माजी खासदार विकास महात्मे यांचा नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा पाहणी दौरा

Jun 21, 2025


होळकर वाडा जतन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांच्या शी बोलणार =विकास महात्मे

प्रतिनिधी (निफाड )नांदूर मध्यमेश्वर येथे होळकर वाडा पाडल्या संदर्भाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमातून आल्या त्याचप्रमाणे सदर वाड्याच्या भिंती पाडण्याचा प्रकारही घडलेला आहे आणि या सर्वांमध्ये मोठी राजकीय ताकद असून या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल व समितीच्या मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती संपूर्ण ग्रामस्थांच्या मते हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वाड्यातील मंदिर गावासाठी कायमस्वरूपी खुले असावे व हे मंदिर गावासाठी असावे असे आवाहन करण्यात आले तर पद्मश्री माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सदर मंदिर हे गावासाठी असावं त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले वस्तूंची जपणूक व्हावी वाड्याच संवर्धन व्हावं व संवर्धनासोबतच मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावं तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ज्या वस्तू या ठिकाणी उभ्या केल्या त्या सर्व वस्तू या जपल्या जाव्यात तसेच अहिल्यादेवींचे पूर्णाकृती भव्य स्मारक व्हावे व परिसरात आहिल्यासृष्टीची निर्मिती व्हावी अशी स्पष्ट भूमिका विकास महात्मेंनी मांडली. अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे अद्वितीय आहे अहिल्यादेवींच्या कार्याची कुणी तुलना करू शकत नाही मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य हे जगविख्यात असून त्यांचा खाजगीचा वाडा हा अहिल्यादेवींच्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि अशा वाड्याची जर तोडफोड होत असेल तर ही गोष्ट अक्षम्य आहे आणि म्हणून या संदर्भात पर्यटन विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष मार्ग काढण्यावर भर देणाऱ असल्याचे महात्मे यांनी सांगितलं नांदूर मध्यमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली मंदिरे व वाडा यासाठी भरून निधीची तरतूद करण्यासंदर्भात ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्या संदर्भात त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत मंजूर असलेला निधी हा तसाच राहून आणखी निधी त्यासाठी मंजूर होण्या संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच बीजेपी चे प्रभारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही जागी या संदर्भात चर्चा करून योग्य तो मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी खासदार विकास महात्मे यांनी सांगितले.

या प्रसंगी मनमाड मा. नगराध्यक्ष गणेश भाऊ धात्रक, समाधान बागल, समिती नाशिक युवा जिल्हाप्रमुख सनी फसाटे, शरद शिंदे, भाऊसाहेब भवर, मुकुंदराज होळकर,गोरख कांदळकर, संघर्ष नवनाथ सोनवणे,ईश्वर माळी, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बंडू कुवर, दीपक सूडके, संतोष पोमणार भाऊसाहेब ओहोळ,तुषार चिंचोले, मोरे सर,, वाळूबा जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.