loader image

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Jul 27, 2025


मनमाड – विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित मॉडेल्स)माध्यमातून विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे आणि त्यातून त्या विषयाची गोडी निर्माण करणे हा प्रयोग नवीन शैक्षणिक धोरणाच्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाशी सुसंगत असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक फादर-माल्कम यांनी केले; ते शाळेमध्ये रिच एज्युकेशन ॲक्शन प्रोग्राम (रिप-Reach Education Action Program) आणि सेंट झेवियर संस्था ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत आयोजित केलेल्या स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग व मॅथेमॅटिक्स) प्रशिक्षणांतर्गत बोलत होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर व प्रशिक्षण देणारे स्टेम मेंबर उपस्थित होते.
हॅलो रोबोट ,मोनोरेल, रॅक अँड पिनीयन, प्रेसिंग मशीन, पुली अँड फोर व्हील ड्राईव्ह, मार्बल रन, क्विक सर्किट , क्लॉक ,सर्कल मेकिंग ,जायंट व्हील, मेरी गो राऊंड, म्युझिकल बोट,डिजिटल डिजिटल,ट्रेब्युचेट,टोल बुथ, एमआयटी ॲप इन्व्हेटर

व टिंकरकॅड इत्यादी मॉडेल्सचे तयार सुटे भाग विद्यार्थ्यांना देऊन, प्रत्यक्ष मॉडेल्स तयार करण्यास सांगून,त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव या प्रशिक्षणातून दिला गेला. तीस दिवसांच्या या प्रशिक्षणात शाळेतील इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितीय विषयातील संकल्पना समजावून सांगण्यात आल्यात. याच संकल्पनेवर देशभरात चालू असलेले जे विविध मोठं मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांची व त्यांच्या कार्यप्रणालीची ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या प्रशिक्षणास मनमाड नगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मा.प्रशासन अधिकारी मनीष गुजराती तसेच मा.केंद्र समन्वयक भावसार सर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. दीपक गुप्ता, विकास पांडे, बालकिशन भारद्वाज, शशिकांत कनौजिया, सुरज चौबे, शिवांगणी मौर्या, खुशिता मानपुरी इत्यादी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्टेम प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संबंधित कौशल्यात प्रशिक्षित केले.सदरचे प्रशिक्षण शाळेतर्फे विद्यार्थ्यांना विनामुल्य देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.