मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये ‘आजी-आजोबा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील इयत्ता दहावीतील श्रद्धा व समृद्धी या विद्यार्थिनीचे आजी-आजोबा श्री. परशुराम वामनराव झाल्टे, व सौ. रंजना परशुराम झाल्टे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना, पर्यवेक्षित अनिल निकाळे सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवर श्री. व सौ. झाल्टे आजी आजोबांचा प्रतिनिधिक स्वरूपामध्ये मुख्याध्यापकांनी शाल व भेटवस्तू देऊन सन्मान केला.कुमार रुद्र सचिन इंगळे याने ‘आजी आजोबांचे घरातील स्थान ‘याबद्दल आपल्या भाषणातून माहिती दिली तर मुख्याध्यापकांनी कुटुंबाचे आधारस्तंभ म्हणून आजी-आजोबांचे महत्त्व सांगितले.प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणाऱ्या सौ.रंजना परशुराम झाल्टे यांनी नातवांमध्ये रमल्याने आयुष्याचं सोनं झाल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वासंतिका दिलिप देवरे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री गोडगे बाबू खंडू सर यांनी केले.
राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...







