रावसाहेब थोरात सभागृह ,नाशिक येथे आज दि.२२ सप्टेंबर २०२५ राजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ संलग्न व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघा तर्फे संपन्न झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.चे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांना मा.शिक्षक आमदार नाशिक श्री.किशोरजी दराडे , पदवीधर आमदार नाशिक मा.श्री.सत्यजित तांबे, मा.खासदार श्री.भास्करराव भगरे, मा.प्रल्हादजी साळुंखे इत्यादी मान्यवरांचे शुभ हस्ते आदर्श कलाशिक्षक (विशेष पुरस्कार)२०२५ ,सन्मानचिन्ह , गुलाबपुष्प देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...