मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी जपत महाराष्ट्र राज्या तील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र भागातील पूरग्रस्त बांधवान साठी वस्तू स्वरूपात ऐच्छिक मदत देण्याचे आवाहन केले आहे यात धान्य, किराणा सामान, आवश्यक नवीन कपडे, रुग्णासाठी औषध, विध्यार्थी साठी शालेय वस्तू, व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू ट्रस्ट तर्फे मनमाड शहर व परिसरातून संकलित करून पूरग्रस्त बांधवाना पर्यत पोहचवल्या जाणार आहेत तरी इच्छुकांनी ➖9422756716➖9511834089➖927097352➖9850191744➖9423255566➖8668954060➖या मोबाईल नंबर वर संपर्क करून आपल्या इच्छे नुसार आपले राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य म्हणून पूरग्रस्त बांधवानसाठी ऐच्छिक वस्तू स्वरूपात मदत करावी हे विनंती आवाहन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...