मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीयुत प्रभाकर झळके सर, शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, शाळेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना ,शाळेचे माननीय पर्यवेक्षक श्री. अनिल निकाळे सर कुमार वेद अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांनी आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री स्वप्नील बाकळे सर यांनी केले. तर वेद अमृतकर या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री प्रभाकर झळके सर यांनी विविध जादूचे प्रयोग करून विद्यार्थ्यांची करणूक केली तसेच विनोद सांगून विद्यार्थ्यांचे निखळ मनोरंजनही केले.
मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...









