loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Nov 29, 2025


मनमाड: येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार व शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी मुख्य जिल्हा कार्यकारी क्रीडा अधिकारी म्हणून नाशिक येथे कार्यरत असणारे आकाश संतोष शिंदेसाहेब उपस्थित होते. त्यांच्या समवेत शाळेचे माननीय फादर माल्कम, माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक श्री. अनिल निकाळे सर, फादर विवेक, पीटीएचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद झाल्टे ,मा.सिस्टर रोज (सेंट व्हिन्सेंट हाऊस सुपीरियर ),सिस्टर भावना (करुणा केअर सुपीरियर), तसेच मनमाड धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर सहायराज त्याचप्रमाणे माजी क्रीडा शिक्षक श्री दिवाकर दोंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलेले श्री. आकाश शिंदेसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून व इतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून क्रीडा महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे मार्शल सुधाकर कातकडे सर व इतर सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना दत्तू जाधव व श्री प्रकाश नान्नोर सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. दत्तू जाधव सरांनी करून दिला तर आभार प्रदर्शन सौ. अंजलीना झेवियर मॅडम यांनी केले. दत्तू जाधव, परविंद्रसिंग रिसम , स्वप्निल बाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डंबेल्स व लेझीम कवायत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.अभ्यासाबरोबरच खेळाला देखील तितकेच महत्त्व दिले पाहिजे; असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश शिंदे यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणातून केले.तर माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून क्रीडा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेऊन महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. या शैक्षणिक वर्षात जिल्हा व विभाग स्तरावर शाळेचे जे विद्यार्थी विविध खेळात चमकले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या विविध मैदानी स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हिक्टरी स्टॅंडवर विविध पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवाला शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिपाई वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले. या महोत्सवाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महोत्सवाला विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
.