Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Dec 26, 2025

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी अविनाश वडक्ते याचे आई वडील श्री.तुकाराम वडक्ते व सौ.वैशाली तुकाराम वडक्ते तसेच कु.आरती वसंत आहिरे या विद्यार्थिनीची आई श्रीमती सुरेखा वसंत आहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या समवेत व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम , उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर , फादर लाईड, फादर विवेक, सिस्टर अग्नेस, सिस्टर रोज, सिस्टर भावना, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद झाल्टे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ.निलम प्रशांत अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री व सौ वडक्ते तसेच श्रीमती आहिरे यांच्या हस्ते शाळेतील चित्रकला हस्तकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शाळेचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापिका, तसेच पर्यवेक्षक यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री वडक्ते व श्रीमती आहिरे यांनी आपल्या भाषणातून शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात. तसेच मुख्याध्यापक फादर यांनी आपल्या भाषणातून, वर्षभरात शाळेत झालेल्या विविध घडामोडींची माहिती उपस्थित पालकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत वाले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख अंजलीना झेवियर मॅडम यांनी करून दिली पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे निवेदन श्री. सुधाकर कातकडे सर (क्रीडा विभाग)तसेच श्रीमती माया शिंदे मॅडम (कला विभाग)यांनी केले. आभार प्रदर्शन सौ एलिझाबेथ शेल्टे मॅडम यांनी केले.

  • त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना नृत्य,स्वागत नृत्य, येशू जन्म नाटिका, पर्यावरण नाटीका ,विविध राज्यातील लोकनृत्ये, देशभक्तीपर नृत्ये, एकात्मतेवर आधारित नृत्यनाटीका, मानवी मनोरे आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत. सदरहू सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय मोहिते सर व सौ मनीषा पानपाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कु. आरती आहिरे , कु.श्रद्धा झाल्टे, आदित्य गायकवाड, स्वप्निल सोनवणे या विद्यार्थ्यांनी खुमासदार पद्धतीने केले. या स्नेहसंमेलनाच शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षक तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]