loader image
[ays_poll id=7]

केंद्राचा अर्थसंकल्प यंदा ‘रविवारी’ सादर होणार!!

Jan 8, 2026

नुकतीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे.

संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला म्हणजेच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करतील. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल. ज्यातून अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक स्थिचीचं चित्र समोर मांडलं जाईल.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात आयोजित केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कामकाज 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कामकाज सुरु राहील.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला देशाचा 88 वा अर्थसंकल्प सादर करतील. 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात आह. यापूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर केला जात होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरतील. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर, दुसरीकडे पी. चिदंबरमन यांनी नऊ वेळा अर्थ संकल्प सादर केला आहे. तर, प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.