loader image
[ays_poll id=7]

जिल्हास्तरीय केमियाड स्पर्धेत मनमाड महाविद्यालयाचे सुयश

Jan 27, 2026


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड येथील रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय केमियाड 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम पारितोषिक पटकाविले. म. स. गा. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मनमाड महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 18 महाविद्यालयांतील रसायनशास्त्र विभागाच्या संघातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विविध फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांच्या विषयज्ञानाची, प्रयोगशीलतेची, तर्कशक्तीची व संघभावनेची कसोटी घेण्यात आली. अत्यंत चुरशीच्या आणि स्पर्धात्मक वातावरणात मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी डॉ. बी. जी. वाघ, माजी प्राचार्य तसेच डॉ. आर. एस. भांबर, एस. पी. एच. फार्मसी महाविद्यालय, पंचवटी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजयी संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी अतिथींनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत विज्ञान शिक्षणातील अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले.
या विजयी संघाचे नेतृत्व डॉ. ए. व्ही. गजभिये यांनी केले. संघाला रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बी. एस. देसले तसेच डॉ. आर. एस.शिंदे, प्रा. ए. आर.बुकाने प्राध्यापक एम. सी. नागरे विभागातील या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे आणि प्राध्यापकांच्या योग्य दिशादर्शनामुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, डॉ. संपदादीदी हिरे तसेच डॉ. अद्वय हिरे यांनी विजयी संघाचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील यांनीही रसायनशास्त्र विभाग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत,मनमाड महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग हा केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. अद्ययावत अभ्यासक्रम, प्रयोगाधिष्ठित अध्यापन पद्धती, संशोधनाभिमुख दृष्टिकोन तसेच विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाची संधी देणे, हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे. केमियाड 2026 सारख्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळालेले यश हे विभागातील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध तयारी आणि विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे फलित आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना भविष्यातील संशोधन, उच्च शिक्षण व औद्योगिक क्षेत्रासाठी सक्षम घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रसायनशास्त्र विभाग करत आहे. अशा शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे गौरवोद्गार काढले.
या यशामुळे मनमाड महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची व विज्ञान क्षेत्रातील भक्कम वाटचालीची पुन्हा एकदा प्रचिती आली असून परिसरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
.