loader image
[ays_poll id=7]

मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

Feb 20, 2026

← Back

Thank you for your response. ✨

तरुण वर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाबद्दल जागृती व्हावी तसेच टिव्ही, मोबाईल मध्ये गुंतलेल्या तरुण पिढीला मातीशी जोडण्यासाठी, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शिवयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऐतिहासिक गड – किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. व्ही एन नाईक हायस्कुल च्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकुती तयार केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एन नाईक हायस्कूल च्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ धात्रक, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव तथा नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, अशोक परदेशी, संजय कटारे, नरेश गुजराथी, अमर चव्हाण, प्रकाश पठाडे, राकेश कोल्हे, प्रा समाधान सुखदेवे, विक्की सुरवसे, नरहरी उंबरे, मुख्याध्यापक गायकवाड सर उपस्थित होते. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारलेले गडकिल्ले बघण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी भेट देत पाहणी करत या कार्याचे कौतुक केले
माजी आमदार जगन्नाथ धात्रक म्हणाले की, क्रमांक कोणाचा आला हे महत्ताचे नाही. ऐतिहासिक गढ-किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी इतिहासाची पाने चाळली, हे महत्त्वाचे. स्पर्धकांनी या प्रयत्नांना स्पर्धेच्या दृष्टीने न बघता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व तरुण वर्गात पोहोचविण्याचा प्रयत्न असे समजावे. पुढील वर्षी यापेक्षा मोठ्या जोमाने स्पर्धा घेणार असल्याचे ते म्हणाले.
प्रथम क्रमांक के आर टी हायस्कूल, द्वितीय क्रमांक गुड शेफर्ड स्कुल, तिसरा क्रमांक सरस्वती विद्यालय, चौथा क्रमांक संत झेवीयर्स हायस्कूल, पाचवा क्रमांक छत्रे हायस्कूल आणि उत्तेजनार्थ शेहजादी स्कुलच्या संघांना देण्यात आले
धकाधकीच्या वातावरणात ही किल्ले स्पर्धा एक वेगळं चैतन्यच घेऊन आली. केवळ मुलेच नाही तर पूर्ण कुटुंब यात सहभागी झाल्याने त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण होईल असा उपक्रम राबविल्याबद्दल कला शिक्षक, मान्यवरांनी पोलीस – पत्रकार आणि स्पर्धकांचे कौतुक केले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १२५ स्पर्धक या स्पर्धमध्ये सहभागी होते. विजेत्या स्पर्धकांनी बनवलेल्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परिक्षण कलाशिक्षक काशिनाथ आहेर, आशिष खेमणारे, भूमिका सानप यांनी केले. प्रकल्प संयोजक म्हणून मिलिंद वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष उपाली परदेशी, जनार्दन देवरे, पाहुण्यांचे परिचय आनंद बोथरा यांनी करून दिला तर आभार अशोक बिदरी यांनी केले. योगेश म्हस्के, गणेश केदारे, रुपाली केदारे, प्रिया परदेशी, दीपाली खरे, आम्रपाली वाघ, नैवेद्या बिदरी, वैशाली मोरे, प्रियांका बोथरा, सतीश शेकदार, निलेश वाघ, विशाल मोरे, अनिल निरभवणे, प्रवीण व्यवहारे यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
.